सोमवार, २५ एप्रिल, २०२२

डॉ. आंबेडकरांचा भारताच्या स्वातंत्र्याबाबतचा दृष्टिकोण

साधारणतः डॉ. आंबेडकर जेंव्हा व्हाईसरायच्या मंत्रीमंडळात मजूर मंत्री म्हणून सामील झाले तेव्हा काँग्रेसच्या ब्राम्हणी मीडिया आणि इतर जातीयवादी समर्थकांनी डॉ. आंबेडकरांना ब्रिटिशांचे हस्तक ठरविण्याचा चंग बांधला होता. ब्रिटिशांच्या हातचे बाहुले, देशद्रोही वगैरे ठरवून टाकले होते.

बाबासाहेब व्हाईसरायच्या मंत्रीमंडळात मजूर मंत्री म्हणून सामील व्हायचे काय कारण असेल?

बाबासाहेब जेंव्हा व्हाईसरायच्या मंत्रीमंडळात सामील झाले त्यावेळेस ब्रिटिश सरकरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरु होती. काँग्रेस आणि त्यांचे समर्थक त्यात मोठ्या प्रमाणात सामील होते. अशावेळेस काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला साथ  देण्याऐवजी बाबासाहेब ब्रिटिश व्हाईसरायच्या मंत्रीमंडळात मजूर मंत्री म्हणून सामील झाले याचा काँग्रेसमधील ब्राम्हण-बनिया नेत्यांना राग आलेला होता. बाबासाहेब ब्रिटिशांपासून देशाला स्वातंत्र्य मिळावे याच्या समर्थनार्थ होते. गोलमेज परिषदेपासून अनेक ठिकाणी त्यांनी ते बोलून सुद्धा दाखविले होते. परंतु काँग्रेसमधील ब्राम्हण-बनियांची आणि बाबासाहेबांची स्वातंत्र्याची कल्पना वेगळी होती. काँग्रेसमधील सवर्ण ब्राम्हण-बनिया ज्यांनी शेकडो वर्षे जाती आणि धर्माच्या नावावर अस्पृश्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला होता, गुलामीत ठेवले होते त्यांना स्वातंत्र्यानंतर देशाची सत्ता पूर्णपणे त्याच वर्गाच्या हातात यावी असे वाटत होते. तर बाबासाहेबांचा दृष्टिकोण हा पुरोगामित्वाच्या गोष्टी करत असले तरी मनातून सनातनी, जातीयवादी असलेल्या काँग्रेसी सवर्ण ब्राम्हण-बनियांच्या हातात सत्ता जाऊ नये हा होता. ज्यांनी शेकडो वर्षे अस्पृश्यांना गुलामीत ठेवले अशा सवर्ण ब्राम्हण-बनियांच्या हातात सत्ता जाणे अस्पृश्यांच्या दृष्टीने फार मोठी आपत्ती ठरेल असे डॉ. आंबेडकरांना वाटत होते. त्यासाठी इंग्रज सरकार जोपर्यंत आहे तोपर्यत त्यांच्या मदतीने अस्पृश्य समाजाच्या हितासाठी, संरक्षणासाठी ज्या काही तरतुदी लागू करता येईल त्या लागू करुन घेणे हा बाबासाहेबांचा हेतू होता. त्यावेळेस मजुरांची आणि अस्पृश्यांची स्थिती जवळपास सारखीच होती. त्यामुळे या वर्गाच्या हिताच्या अनेक गोष्टी व्हाईसराच्या मंत्रीमंडळात सामील होऊन करता येण्यासारख्या होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: