सोमवार, २५ एप्रिल, २०२२

रिडल्स इन हिंदुइसम

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  जानेवारी १९५४ मध्ये 'रिडल्स इन हिंदुइसम' हा ग्रंथ लिहीण्यास सुरुवात केली आणि नव्हेंबर १९५५ मध्ये हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्याच्या चांगल्या प्रतीच्या कागदावर चार प्रति टंकलिखित करण्यात आल्या. जेंव्हा त्यांना विचारण्यात आले की चार चार प्रती टंकलिखित करण्याची काय गरज आहे? त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, "बघ! माझ्या या ग्रंथाचे नाव काय आहे, 'रिडल्स इन हिंदुइसम', खरं म्हणजे या ग्रंथाचे नाव हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. माझा स्वतःचा छापखाना तर नाही आणि स्वाभाविकपणे हा ग्रंथ छपाईसाठी कुठल्यातरी हिंदुच्या छापखान्यात जाईल. होऊ शकते या ग्रंथाची पांडुलिपि हरविली जाईल, जाळली किंवा नष्ट केली जाईल आणि अशा रितीने मी कित्येक वर्षे केलेली मेहनत व्यर्थ जाईल. म्हणून किती खर्च येईल याला महत्व नाही. अशावेळेस माझ्याकडे एक जास्तची प्रत जरूर असावयास पाहिजे".

हा ग्रंथ छपाईसाठी पूर्णपणे तयार होता, तरीही त्याची छपाई करण्यापासून थांबवून ठेवण्यात आले होते. कारण बाबासाहेबांची त्यामध्ये दोन चित्र समाविष्ट करण्याची इच्छा होती. एक चित्र डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे होते जे भारताचे राष्ट्रपती होते. जेव्हा ते वाराणसी येथे गेले होते, तेंव्हा त्यांनी तिथे ब्राम्हणांची पूजा करुन त्यांचे पाय धुवून ते पाणी प्राशन केले होते. तर दुसरे चित्र पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित होते. १५ ऑगष्ट १९४७ च्या मध्यरात्री ब्राम्हणांनी एक यज्ञ आयोजित केला होता, जो स्वतंत्र भारताचे प्रथम प्रधानमंत्री एक ब्राम्हण व्यक्ति होत आहे यासाठी आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळेस पंडित नेहरू यांनी ब्राम्हणांनी दिलेला राजदंड धारण केलेला होता आणि त्यांनी दिलेलं गंगाजल प्राशन केलं होतं. त्यापैकी राजेंद्र प्रसाद यांचं चित्र उपलब्ध होतं परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ते चित्र कुठून मिळेल याचा शोध सुरु होता.

परंतु आपल्या आयुष्यात बाबासाहेब हा ग्रंथ बघू शकले नाहीत. कारण त्यांच्या ग्रंथाच्या चारही पांडुलिपि एकाचवेळी गायब झाल्यात. यामागे कुणाचा हात होता?

परंतु आनंदाची गोष्ट ही आहे की, त्यांच्या इतर लिखित सामुग्रीच्या माध्यमातून ह्या ग्रंथ पुन्हा लोकांच्या सामोर आला. यासाठी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देणे आवश्यक आहे.
संदर्भ - डॉ. आंबेडकर के अंतिम कुछ वर्ष,

           नानकचंद रत्तू 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: