डॉ. आंबेडकरांनी ब्राम्हण, ब्राम्हणेत्तर आणि अस्पृश्य अशी जातीय उतरंड विषद केली आहे. ब्राम्हण अल्पसंख्य धार्मिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक सर्व सत्तेवर ताबा असलेले आणि अस्पृश्यांचे विरोधक. ब्राम्हणेत्तर बहुसंख्य, ज्यांच्यावर अस्पृश्यांएवढे बंधने नाहीत, ब्राम्हणांपेक्षा खालच्या स्थानावर परंतु अस्पृश्यांपेक्षा स्वतःला उच्च समजणारे आणि म्हणून अस्पृश्यांचे ते सुद्धा विरोधक. अस्पृश्य अल्पसंख्य. बहुसंख्य ब्राम्हण, ब्राम्हणेत्तरांकडून प्रत्येक बाबतीत नागवले गेलेले. या जातीय उतरंडीत प्रत्येक जात आपल्यापेक्षा वरच्या जातीचा जेवढा राग करीत नाही त्यापेक्षा जास्त खालच्या जातीचा द्वेष करतो. डॉ. आंबेडकर नाही तर अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधित्व मी करतो असे म्हणणा-या गांधींना ही परिस्थिती माहीत नव्हती असे म्हणता येत नाही. या परिस्थितीत अस्पृश्यांच्या हिताची काळजी घेणारा खरा नेता निवडून येण्यासाठी अस्पृश्यांचे स्वतंत्र मतदार संघ आवश्यक होते. कारण अस्पृश्य अल्पसंख्य असल्यामुळे स्वतःच्या मतांवर निवडून येऊ शकत नव्हते. आणि बहुसंख्य ब्राम्हण, ब्राम्हणेत्तर अस्पृश्यांच्या हिताची काळजी घेणा-या नेत्याला मत सुद्धा देणार नव्हते. ह्या परिस्थितीची पूर्ण कल्पना असल्यामुळे डॉ. आंबेडकर आणि ब्रिटिशांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघासाठी गांधींचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु गांधी तयार झाले नाही. तरीही ब्रिटिशांनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला आणि त्याविरोधात गांधीनी प्रथम आणि अंतिम आमरण उपोषणाद्वारे ब्लैकमेल करुन डॉ. आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघ सोडावयास भाग पाडले. गांधींना अस्पृश्यांच्या हिताची काळजी घेणारे खरे नेते नको होते तर ब्राम्हण-बनिया सवर्ण उच्चजातीच्या मतानुसार चालणारे अस्पृश्य नेते हवे होते जे त्यांना संयुक्त मतदार संघात आरक्षित जागेवरुन निवडता आले.
आजही बहुसंख्य ब्राम्हण-ब्राम्हणेत्तर अनुसूचित जाती,जमातीमधून तोच नेता निवडतात जो त्यांच्या मतानुसार चालतो. अनुसूचित जाती, जमातीच्या १३१ खासदारांपैकी कोण त्यांच्या वर्गाचे खरे प्रतिनिधित्व करतो? सगळे होयबा आहेत.
मग स्वतंत्र मतदारसंघ असते तर अनुसूचित जाती, जमातीचे खरे नेते, आर एस एस चे खरे विरोधक १३१ प्रतिनिधि निवडून आले असते. गांधींच्या हट्टामुळे ते शक्य झाले नाही. आज छुपे संघी आणि उघड़ संघी आलटून पालटून सत्तेत येत आहेत. छुपे संघी फ़क्त दाखविण्यापुरती आर एस एस वर बंदी घालण्याची नौटंकी करु शकतात. त्याशिवाय काही नाही.
आणि यासाठी गांधींशिवाय जबाबादर कोण?