मंगळवार, ६ जुलै, २०२१

काँग्रेसी म्हणजे छुपे संघीच

फ़क्त ब्राम्हण बनिया आणि सवर्ण उच्चजातींच्या हातात सत्तेच्या चाव्या ठेवणे या स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेल्या धोरणात काँग्रेसने आजही बदल केलेला नाही. अनुसूचित जाती या अल्पसंख्य आहेत त्यामुळे ज्या देशात पराकोटीचा जातीयवाद आहेत तिथे संयुक्त मतदार संघात राखीव जागेतून अनुसूचित जातींनी कितीही एकजुट दाखविली तरी त्यांच्या पसंतीचा उमेदवार कधीही निवडून येऊ शकत नाही ही गोष्ट ब्रिटिश आणि डॉ. आंबेडकरांनी गांधींना परोपरीने समाजावून सांगितली. पण गांधींनी सवर्ण उच्चजातींची हुजूरेगिरी करणारा अनुसूचित जातीचा उमेदवार निवडून आणता यावा यासाठी आपले प्राण पणास लावले. अनुसूचित जातींना स्वतंत्र मतदार संघ देऊन ब्रिटिश जर देशाला स्वातंत्र्य देत असतील तर असे स्वातंत्र्य मला नको इथपर्यन्त गांधींनी भूमिका घेतली. गांधींना माहीत होतं की या जातीयवादी देशात ब्राम्हण-बनिया सवर्णांची हुजूरेगिरी करणारा अनुसूचीत जातीच्या एका क्षुद्र व्यक्तीला कांग्रेसमधुन निवडणुकीत उभे करुन आंबेडकरांच्या पक्षातील कोणत्याही नेत्याला सोडा प्रत्यक्ष आंबेडकरांना सुद्धा हरविता येते. आणि काँग्रेसने ते खरे सुद्धा करुन दाखविले. 

पूर्वी काँग्रेसची फ़क्त अनुसूचित जातिबाबत ही भूमिका होती, आता त्यात मुस्लिमांचाही समावेश झाला. म्हणूनच आता सुद्धा अनुसूचित जाती, जमाती, मुस्लिमांनी काँग्रेसचे वर्चस्व नाकारून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला की त्यांना बी टीम म्हणून टारगेट केले जाते. 

यावरून हेच सिद्ध होते की काँग्रेस भाजप ह्याच एकमेकांच्या ए टीम, बी टीम आहेत. अनेक राज्यात कुठलाही जनाधार नसतांना आपले उमेदवार उभे करुन भाजपला सत्तेत आणण्यात कांग्रेसचाच हात आहे हे सुद्धा सिद्ध झाले आहे. आणि म्हणूनच काँग्रेसवाल्यांची छुपे संघी ही त्यांची खरी ओळख उघड़ झाली हे त्यांना मिरच्या झोंबण्याचे खरे कारण आहे.