सोमवार, १४ जून, २०२१

मा. गांधींचे अस्पृश्यता विरोधी अभियाय असफल का झाले?

मा. गांधींचे अस्पृश्यता विरोधी अभियाय असफल का झाले? कारण हिंदूंनी त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद दिलाच नाही. आणि मुख्य म्हणजे त्यांना हिंदूना नाराज करावयाचे नव्हते. 

अस्पृश्यांसाठी एक सार्वजनिक रस्ता खुला व्हावा या हेतूने १९२४ साली वायकोम या गावात एक सत्याग्रह झाला होता. तिथे सत्याग्रहींसाठी म्हणून शिखांनी लंगर सुरु केले होते. यावर मा. गांधींनी काय करावे? त्यांनी सत्याग्रहाला विरोध तर केलाच त्यासोबतच सत्याग्रहींसाठी शिखांनी जे लंगर सुरु केले होते त्या शिखांच्या या कृतीलाही विरोध दर्शविला. 

जेव्हा अस्पृश्यांनी मुंबई इलाख्यात मंदिर प्रवेश आणि सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरण्याच्या हक्कासाठी सत्याग्रह केला तेव्हा अस्पृश्यांनी मा. गांधीनी त्यांच्या या सत्याग्रहाला आपले आशीर्वाद द्यावे अशी विनंती केली. कारण खरे म्हणजे सत्याग्रह हे शस्त्र गांधींनीच विकसीत केले होते. 

यावर मा. गांधींनी काय करावे? तर त्यांनी अस्पृश्यांच्या सत्याग्रहला पाठिंबा देण्याऐवजी सत्याग्रहाला विरोध दर्शविणारे निवेदन प्रकाशित केले. त्या निवेदनात जे होतं ते वाचून सर्वसामान्य माणसाची तळपायाची आग मस्तकात जाईल. त्यात त्यांनी असे म्हटले की, सत्याग्रह हे विदेशी लोकांविरुद्धच उपयोगात आणावयाचे शस्त्र आहे. कोणीही या शस्त्राचा उपयोग आपल्या भावाबंदाविरुद्ध, आपल्या देशवासियांविरुद्ध करु नये. म्हणून अस्पृश्यांना हिंदूविरुद्ध सत्याग्रहाला अनुमती नाही. (संदर्भ - काँग्रेस आणि गांधीनी अस्पृश्यांप्रति काय केले?)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: