शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

निंदा कराल की गौरव कराल ?

 समजा एका ग्रंथात दोन कायदे आहेत. 

१) घरातले उरले-सुरले, टाकाऊ धान्य, अन्न शुद्र आणि अतिशूद्रांना द्यावे. 

२) शुद्र जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नसतील तर त्याचा शिरच्छेद करावा. 

आता शूद्रांना मदत करावी असे सांगितले आहे म्हणून तुम्ही त्या ग्रंथाचा गौरव कराल की शुद्र कोणाच्या म्हणण्याप्रमाणे वागत नसतील तर त्याचा शिरच्छेद करावा अशा क्रूर शिक्षा असणा-या ग्रंथाची निंदा कराल? 

सहाजिकच निंदा करणे हीच माणुसकी ठरेल. कारण त्या ग्रंथात चांगल्याच्या तुलनेत वाईट एवढे अफाट आहे की त्या चांगल्याला सुद्धा काहीही अर्थ राहत नाही. 

मनुस्मृतिमधील कायदे वरील प्रकारचे आहेत. वाईट अफाट तर चांगले अत्यल्प. म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतिचे दहन केले. तरीही काही जण या ग्रंथातील अफाट वाईटाकडे दुर्लक्ष करीत या ग्रंथाचा गौरव का करीत असतील? दोन कारणे असू शकतात. एकतर नीच विचारसरणी असेल किंवा शेकडो वर्षापासून जातीच्या नावावर शोषण करण्याची जी सवय असेल त्यामुळे आलेली मानसिक विकृती असेल?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: