आपल्याला असे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे की भाजप, आर एस एस च्या सत्तेच्या काळातच मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक कर्मकांड यामध्ये वाढ झालेली आहे. मुख्यता हा काँग्रेससारख्या कोणत्याही एका पक्षाचा दोष नाही. दोष आहे पुरातन अवैज्ञानिक ब्राम्हणी मानसिकतेचा. त्यामुळे फ़क्त भाजपला धारेवर धरून काँग्रेसला सूट देण्यात अर्थ नाही. ब्राम्हणी मानसिकतेचे प्राबल्य जिथे असेल तिथे हा दोष आढळणारच. फ़क्त प्रमाण कमी जास्त होऊ शकते. कुठे लपून तर कुठे उघड़ पद्धतीने हे केले जाते.
जवाहरलाल नेहरू हे आधुनिक विचारसरणीचे होते असा एक भ्रम पसरविण्यात आलेला आहे. परंतु माझा तर्क आहे की नेहरू कधीही आधुनिक विचारसरणीचे प्रतिनिधित्व करीत नव्हते. त्यांची जीवन शैली आधुनिक होती आणि त्यांचे शिक्षण सुद्धा आधुनिक पद्धतीने झाले होते. परंतु त्यांनी देशाची राजकीय सत्ता हातात घेतल्यानंतर त्यांनी भारताला परंपरा आणि पारंपरिक मुल्ये यापासून कधीही मुक्त करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी आय आय टी, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ सायन्स सारख्या संस्था स्थापन केल्या परंतु समाज जीवनातील पुरातन मूल्य यावर कधीही प्रहार केला नाही.
भारताला मिळालेलं स्वातंत्र्य ही अशी संधी होती जिथुन देश आधुनिकतेच्या प्रवासाला सुरुवात करुन यूरोप प्रमाणे वैज्ञानिक क्रांति आणि औद्योगिक क्रांतीचे लाभ प्राप्त करु शकत होता. परंतु नेहरुने ती संधी वाया घालवली.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आले त्यावरून आपण कुठल्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली ते बघण्यासारखे होते. लैरी कोलिन्स आणि डोमनिक लैपियर यांनी आपल्या 'फ्रीडम एट मिडनाईट' या आपल्या पुस्तकात त्याचे वर्णन केले आहे. स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी १४/१५ ऑगष्ट १९४७ ला दोन दक्षिण भारतीय ब्राम्हणांनी स्वातंत्र्य समारोहात जाण्यासाठी नेहरूंना मोठ्या प्रमाणात सजविले. दोघांनी जवाहरलाल नेहरूंवर पवित्र जल शिंपडले, कपाळाला भभूत लावण्यात आले, एक दंड त्यांच्या हातात देण्यात आला आणि पवित्र वस्त्र परिधान करण्यात आले. नेहरूंनी हे सर्व प्रसन्नतेने होऊ दिले. हा असा प्रकार होता जसे सामोर जे भव्य कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी तांत्रिक व्यक्तीची मदत जरी घेण्याची गरज पडली तरी त्याकडे दुर्लक्ष करु नये.
घरी हा समारोह पार पडल्यानंतर नेहरू १४/१५ ऑगष्टच्या मध्यरात्री स्वतंत्रता समारोहात गेले तेव्हा त्यांच्या शरीरावरून हे सर्व बाजुला झाले होते. आता त्यांच्या शरीरावर त्यांचा नेहमीचा नेहरू कोट आणि चुस्त पायजमा होता आणि कोटावर ताजे गुलाबाचं फूल होतं. यावरून नेहरू एकाचवेळी दोन परस्परविरोधी भूमिका पार पाडत होते हे त्यांच्या वेशभूषेवरून दिसून येते.
तिथुनच काही दूर संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या सरकारी निवासस्थानी लॉनवर रात्री हवन करण्यात आले, जिथे ब्राम्हणांनी मंत्रोच्चार केला. कोलिन्स आणि लेपियर म्हणतात, "पुरोहित जोर जोरात मंत्र म्हणत होते आणि जे लोक स्वतंत्र भारताचे मंत्री बनणार होते ते हवन कुंडाच्या बाजुला उभे होते. आणि एक ब्राम्हण पवित्र जल त्यांच्यावर शिंपडत होता."
तिथुनच हे सर्व लोक त्या हॉलमध्ये गेले जिथे काही वेळातच देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा होणार होती.
फ्रीडम एट मिडनाईट च्या लेखकांनी सविस्तर सांगितले की, जेव्हा भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबटन यांनी स्वातंत्र्याची तारीख ही १५ ऑगष्ट आहे हे घोषित केले त्यावेळेस देशभरातील ज्योतिष्यानी आकांडतांडव केले. काल आणि पंचांगाची गणना सुरु झाली आणि ज्योतिष्यानी घोषित केले की हा दिवस अशुभ आहे आणि या दिवशी स्वातंत्र्य मिळाले तर देशावर मोठे संकट येईल. शनि, राहु आणि आणखी कोणकोणत्या ग्रहांची दशा कशी आहे याच्या आधारे ज्योतिष्यानी माऊंटबटनला पत्र सुद्धा लिहिले.
त्यावेळी भारतातील शिकागो डेली चे पत्रकार आपल्या मित्राला पाठविलेल्या पत्रात म्हणतात की, "ज्या देशाचा जन्मच मुहर्त पाहून झाला त्या देशातील नागरिक आपल्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोण अंमलात आणतील ही अपेक्षाच चुकीची आहे."
त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर प्रत्येक सरकारी कार्यक्रमात अवैज्ञानिक कर्मकांडाचे पालन होतांना दिसून आले.
- जेव्हा इसरो एखादे सैटेलाइट अवकाशात सोडते तेव्हा प्रथम इसरो प्रमुख तिरुपती बालाजी मंदिरात पुजापाठ करतात.
- ज्यावेळेस देशासाठी युद्ध विमान खरेदी करण्यात येतात तेव्हा वायुसेनेत समावेश करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते.
- नौसेनेमध्ये एखादे जहाज सामील करण्यापूर्वी नारळ फोड़ण्याची प्रथा आहे.
- सरकारी समारोह नेहमी देवी देवतेच्या वंदनेने आणि पूजने सुरु होतो.
ही यादी फार लांब होऊ शकते.
हे सर्व चूक आहे की बरोबर आहे याबद्दल मी काहीच म्हणत नाही. माझं म्हणणं हे आहे की हे सर्व भाजप सत्तेत येण्यापूर्वीपासून सुरु आहे. काँग्रेस, भाजप, डावे कोण सत्तेत आहे यापेक्षा कोणता वर्ग सत्तेत आहे हे बघणे महत्वाचे आहे. काँग्रेस, भाजप, डावे, आप हे सर्व ब्राम्हणी मानसिकतेचे पक्ष आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.