शनिवार, १२ जून, २०२१

मा. गांधींचे तर्क

खरं सांगतो, महात्मा गांधींचे खालील तर्क वा भूमिका वाचून एखाद्याची तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते.

तर काळ तो आहे जेव्हा अस्पृश्यांच्या संघटना आपल्या बंधवांवर होणा-या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी स्वतंत्रपणे काम करत होत्या. ते आपल्या नागरिक आणि सामाजिक अधिकारासाठी सवर्ण हिंदूंच्या विरुद्ध सविनय असहकार आंदोलन करीत होते. अस्पृश्यांनी महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्यातून पाणी पिण्यासाठी आणि नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेशासाठी सवर्ण हिंदूंच्या विरुद्ध सत्याग्रह आंदोलन केले होते. त्यावेळी मा. गांधींचे वागणे अतिशय विसंगत होते. 

सुरवातीला सवर्ण हिंदूंच्या विरुद्ध केलेल्या अस्पृश्यांच्या या सत्याग्रहाला समर्थन न करता अस्पृश्यांनी केलेल्या या सत्याग्रहाची मा. गांधींनी निंदा केली. या सत्याग्रहात अस्पृश्यांची भूमिका अतिशय तर्कसंगत होती. अस्पृश्यांचे म्हणणे होते की गांधींच्या म्हणण्यानुसार सवर्ण हिंदू जेव्हा स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध सविनय असहकार आंदोलन करु शकतात तर अस्पृश्य सवर्ण हिंदूंच्या गुलामीतुन मुक्त होण्यासाठी सवर्ण हिंदूंच्या विरुद्ध सविनय असहकार आंदोलन का करु शकत नाही. हा अतिशय योग्य तर्क होता. परंतु गांधीवर त्याचा काहीही प्रभाव पडला नाही. त्यांनी आपल्या पद्धतीने या तर्काला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. गांधींचं म्हणणं असे होते की अस्पृश्यता हे हिंदुंचं पाप आहे. म्हणून त्याचे प्रायश्चित्य हिंदूंनीच करायला पाहीजे. सवर्ण हिंदूंनीच अस्पृश्यता दूर करण्यासाठी सत्याग्रह करावयास पाहीजे. अस्पृश्यता दूर करण्यासाठी सत्याग्रह करणे हे अस्पृश्यांचे कार्य नाही, कारण ते पापी नाहीत. हा अतिशय बेतुका तर्क होता. याला तर्क म्हणता येणार नाही. याला फार तर वाक्छल म्हणता येईल. परंतु हे स्पष्ट होतं की हा अतिशय बकवास तर्क होता. अस्पृश्यांचं त्यावर उत्तर होतं की, जर गांधींचा हाच दृष्टिकोण आहे की जे पापी असतील त्यांनीच प्रायश्चित्य घेण्यासाठी सत्याग्रह करावा, तर ते हिंदुंना ब्रिटिशांच्या विरुद्ध सत्याग्रह करण्यासाठी का सांगतात. ब्रिटिश साम्राज्यवाद तर ब्रिटिशांचं पाप आहे. मग गांधींच्या तर्कानुसार तर ब्रिटिशांनी सत्याग्रह करावयास पाहीजे. सवर्ण हिंदूंना ब्रिटिशांच्या विरुद्ध सत्याग्रह करण्याची काहीही गरज नाही. अशाप्रकारे अस्पृश्यांनी गांधीजींचा तर्क उडवून लावला. यावरून हे स्पष्ट झालं होतं की सवर्ण हिंदूंच्या विरुद्ध अस्पृश्यांच्या सत्याग्रहाच्या बाबतीत गांधींचा दृष्टिकोण योग्य नव्हता. परंतु गांधी शेवटपर्यंत आपल्या त्याच तर्कावर अडून राहिले. अस्पृश्यांनी कितीही प्रयत्न करुन गांधींनी आपला हट्टीपणा सोडला नाही. 

मा. गांधींच्या दृष्टिकोनात आणखी एक विसंगती होती. दोन ठिकाणी एकसारखेच सत्याग्रह झालेत. पण या दोन ठिकाणी गांधींची भूमिका वेगवेगळी होती. सवर्ण हिंदूंच्या विरुद्ध अस्पृश्यांनी महाड आणि नाशिक येथे सत्याग्रह केला. तसाच सत्याग्रह त्यांनी वाइकोम या गावात सुद्धा केला. गांधींनी वरील तर्क न देता वाइकोम येथील सत्याग्रहाचं समर्थन केलं. एवढंच नाही तर त्यांनी या सत्याग्रहाला आशीर्वाद आणि प्रोत्साहन दिले. तर मग गांधीनी महाड आणि नाशिक येथील सत्याग्रहाला विरोध का केला? काय या दोन सत्याग्रहात असमानता होती? असमानता हीच होती की वाइकोम येथील सत्याग्रह काँग्रेसच्या झेंड्याखाली होता. महाड आणि नाशिक येथील सत्याग्रह अस्पृश्यांनी स्वतंत्ररित्या केले होते. काय गांधींचा विरोध फ़क्त यासाठीच होता? गांधीनी शेवटपर्यंत त्याचे उत्तर दिले नाही. संभवतः गांधी त्या असहाय अस्पृश्यांचे रक्षक नव्हते जे त्यांना आपले रक्षक स्विकारत नव्हते. यावरून हा निष्कर्ष निघतो की, अस्पृश्यांचे स्वतंत्र आंदोलन असेल तर काँग्रेस स्वतःहून त्याला सहकार्य करणार नाही. वास्तविकता ही आहे की काँग्रेसी हिंदू आणि सनातनी हिंदू एकच आहेत. ते निसंकोच होऊन अस्पृश्यांचे डोके फोड़तात. गांधींची ही भूमिका विकृत नसेल तरी अतिशय विसंगत होती. एवढेच नाही तर गांधीनी मुस्लिम,सिख, ईसाई, पारसी, यहूदी लोकांना सांगितले की अस्पृश्यांना कोणीही मदत करु नये. इतर धर्मीय हिंदूना मदत करु शकतात. हिंदू सुद्धा इतर धर्मियांना मदत करु शकतात. फ़क्त अस्पृश्यांना कोणीही मदत करु नये. ईथे सुद्धा त्यांचा हा तर्क जगावेगळा होता. गांधींच्या मित्रांनी अस्पृश्यांप्रति त्यांची कठोरता कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटपर्यंत गांधींनी कुणाचही ऐकलं नाही. गांधीनी अस्पृश्यांचा दृष्टिकोण काय आहे याची मुळीच पर्वा केली नाही. त्यांनी हा विचार नाही केला की सवर्ण हिंदूंसाठी जे पाप आहे तीच बाब अस्पृश्यांसाठी गुलामगिरी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: