शनिवार, १२ जून, २०२१

भारतातील सवर्णांची आरक्षणाबाबत निति सकारात्मक नाही

अमेरिकेत ब्लॅक्स लोकांना जे आरक्षण आहे त्याला तिथे Affermative Policy (सकारात्मक नीती) म्हटले जाते. आज अमेरिकेतील ब्लॅक्स शासन, प्रशासन, मीडिया, उद्योगधंदे, हॉलीवुड सर्व क्षेत्रात पुढे आहे. अमेरिकेतील गो-या लोकांनी प्रत्येक क्षेत्रात ब्लॅक्स लोकांना प्रत्येक गोष्ट शिकण्याची व त्यात सुधारणा करुन यशस्वी होण्याची संधी दिली. कारण अमेरिकेतील गो-या लोकांची ब्लॅक्स लोकंबाबतची नीति सकारात्मक होती. 

मात्र भारतात अनुसूचित जाती, जमातीच्या आरक्षणाबाबत सवर्णांची निति ही नकारात्मक आहे. त्यामुळे शासन प्रशासनातील प्रत्येक अधिका-याने वेगवेगळे डावपेच आखुन आरक्षणात अडथळे आणले. आणि दुसरीकडे शेकडो वर्ष ज्यांनी बिनदिक्कत मनुस्मृतीच्या कायद्यानुसार १००% आरक्षण घेतले तेच लोक ७० वर्षापासून आरक्षण म्हणून बोंबा मारत आहेत. 

शेवटी जे लोक देश स्वतंत्र झाला नाही तरी चालेल परंतु अनुसूचित जाती, जमातीला शासन, प्रशासनात कोणतेही विशेष अधिकार मिळू नये यासाठी प्रयत्न करीत होते त्यांच्याकडून अमेरिकेतील गो-यांसारखी सकारात्मकतेची अपेक्षाच करता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: