८७% बौद्ध हे इतर धर्मातून, मुख्यता हिंदू धर्मातील जातीय जुलुमाला कंटाळून धर्मांतरीत झालेले बौद्ध आहेत.
बौद्धांचा साक्षरता दर राष्ट्रीय साक्षरता दरापेक्षा जास्त असून तो ८१.२९% आहे, तर राष्ट्रीय साक्षरता दर सरासरी ७२.९८% आहे. हिंदुंचा साक्षरता दर ७३.२७% आहे तर अनुसूचित जातीचा (एससी) साक्षरता दर कमी असून तो ६६.०७% एवढा आहे.
बौद्ध स्त्रियांमधील साक्षरता दर ७४.०४% असून एकूण लोकसंख्येचा सरासरी साक्षरता दर ६४.६३% आहे.
बौद्धांमध्ये लिंग अनुपात प्रति १००० पुरुषामागे ९६५ स्त्रिया एवढा आहे. बौद्धांव्यतिरिक्त अनुसूचित जाती (एससी) मधील ९४५ आहे. तर राष्ट्रीय लिंग अनुपात ९४३ आहे. बौद्धांचा कल हा कमी अपत्ये जन्माला घालण्याचा आहे.
दलितांपेक्षा बौद्धांचा शिक्षणाकड़े कल जास्त आहे किंवा असेही म्हणता येईल की शिक्षित दलितांचे बौद्ध धम्माकडे वळण्याचे प्रमाण जास्त आहे.
४३% बौद्ध शहरात राहतात तर एकूण लोकसंख्येचे हेच सरासरी प्रमाण ३१% आहे.
इतर अनुसूचित जातीचे (एससी) राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील योगदान ४०.८७% आहे. तर बौद्धांचे अर्थव्यवस्थेतील योगदान जास्त असून ते ४३.१५% एवढे आहे.
👇👇👇
https://www.indiaspend.com/conversion-to-buddhism-has-brought-literacy-gender-equality-and-well-being-to-dalits-18224/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.