प्राचीन भारताच्या इतिहासाचा बराचसा भाग हा मुळीच इतिहास नाही. प्राचीन भारताला इतिहास नाही असे नाही. त्याची फार विपुलता आहे. परंतु त्याने त्याचे वैशिष्ट्य संपवून टाकले आहे. महिला आणि लहान मुलांच्या मनोरंजनाकरिता त्याला पौराणिक कथा बनविण्यात आले. असे वाटते की ब्राम्हणवादी लेखकांनी जाणीवपूर्वक असे केले. 'देव' हा शब्द घ्या. त्याचा काय अर्थ आहे? काय 'जन-विशेष' हा शब्द मानव परिवारातील सदस्य या अर्थाने वापरण्यात आलेला आहे? असे आढळून येते की हा शब्द अति-मानव संस्थांकरिता वापरल्या गेला आहे. याद्वारे इतिहासाच्या पृष्ठभूमीचा कणा नष्ट केल्या गेला आहे.
'देव' शब्दासोबत मनामध्ये यक्ष, गण, गंधर्व, किन्नर हे शब्द सुद्धा येतात. परंतु ते कोण होते? महाभारत आणि रामायण वाचल्यानंतर असे लक्षात येते की, हे काल्पनिक (पौराणिक) मानव होते, जे वास्तवात अस्तित्वात नव्हते.
परंतु यक्ष, गण, गंधर्व, किन्नर इत्यादी हे मानवी परिवाराचे सदस्य होते. ते देवांच्या सेवेमध्ये होते. यक्ष हे महालांचे पहारेकरी होते. गण हे देवांचे रक्षण करणारे होते. गंधर्व हे संगीत व नृत्यांच्या द्वारे देवांचे मनोरंजन करणारे होते. किन्नर सुद्धा देवांच्या सेवेमध्ये होते. किन्नरांचे वंशज आज सुद्धा हिमाचल प्रदेशामध्ये राहत आहेत.
'असुर' हे नाव घ्या. महाभारत व रामायणामध्ये असूरांचे जे वर्णन आलेले आहे, त्यावरून हे लक्षात येते की, ते अमानवी जगामध्ये राहत होते. असूरांचे असे वर्णन केले गेले आहे की, ते दहा बैलगाड्यामध्ये लादले जाईल एवढे भोजन करीत होते. ते आकाराने दैत्यासारखे होते. ते सहा महिनेपर्यंत झोपत असत. त्यांना दहा तोंडे होती. राक्षस कोण होते? त्यांचे वर्णन सुद्धा अमनुष्य म्हणूनच करण्यात आलेले आहे. ते आकारात, खाण्याच्या क्षमतेत, त्यांच्या जीवन जगण्याच्या सवयी असूरांप्रमाणेच होत्या.
नागांचा उल्लेख अनेकदा आलेला आहे. परंतु 'नाग' कोण आहेत? नागाला एक सर्प किंवा साप म्हटले गेले आहे. हे सत्य असू शकते काय? हे सत्य असो किंवा नसो, हे असेच आहे आणि हिंदू त्यावर विश्वास करतात. प्राचीन भारतीय इतिहासावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे. त्यावर प्रकाश टाकल्याशिवाय प्राचीन भारत हा इतिहासाशिवाय राहील. सुदैवाने बौद्ध साहित्याच्या मदतीने प्राचीन भारतीय इतिहासाला अवशेषाच्या ढिगा-यातून बाहेर काढता येऊ शकते. ज्याला ब्राम्हण लेखकांनी आपल्या मूर्खपणामुळे, पागलपणामुळे ढिगा-यात दडपूण ठेवले आहे.
या ढिगा-याला फेकून देण्याच्या महान कार्यामध्ये आपल्याला बौद्ध (पाली) साहित्याची फार मदत होऊ शकते. आणि त्याच्या खाली दडलेल्या बाबी एकदम स्पष्टपणे व निश्चितपणे पाहता येतात.
बौद्ध साहित्य (पाली साहित्य) सांगते की, देव हे मानव समाजाचाच एक भाग होते. असे अनेक 'देव' आहेत जे बुद्धाकडे आपल्या शंका आणि अडचणी दूर करण्यासाठी येत असत. देव जर मानव नसते तर हे कसे शक्य होऊ शकले असते?
याशिवाय बौद्ध (पाली) त्रिपिटक साहित्य नागांच्या जटिल प्रश्नावर भरपूर प्रकाश पाडते. या साहित्यात गर्भाशयातून उत्पन्न नाग आणि अंडयातून उत्पन्न नाग या दोघांत फरक केला जातो आणि स्पष्ट केले जाते की 'नाग' शब्दाचे दोन अर्थ होतात. मानवी समुदाय हाच या शब्दाचा खरा अर्थ आहे.
याशिवाय असूर हे सुद्धा राक्षस नाहीत. ते सुद्धा 'जन-विशेष' मानवच आहेत. शतपथ ब्राम्हणानुसार असूर हे सृष्टी निर्माता प्रजापतीचे वंशज आहेत. मग ते पापी जीव कसे झाले हे माहीत नाही. परंतु हे सत्य लिपिबद्ध करण्यात आले आहे की, पृथ्वीवर आपला अधिकार स्थापन करण्याकरिता त्यांनी देवांच्या विरुद्ध संघर्ष केला, ते देवांच्या द्वारे जिंकल्या गेले व शेवटी त्यांना समर्पण करावे लागले. हे स्पष्ट आहे की, असूर हे मानवी समाजाचे सदस्य होते, ते राक्षस नव्हते अर्थात मानवेत्तर नव्हते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वरील विचार वाचल्यानंतर मनाला काही प्रश्न पडतात. आणि त्यावर विचार केला तर त्याचे उत्तर सुद्धा सपड़ते. बाबासाहेबांच्या मते ब्राम्हण लेखकांनी लिहिलेले पुरातन ग्रंथ महिला किंवा मुलांच्या मनोरंजनार्थ लिहिले असे वाटते. परंतु त्यांना तसे साहित्य लिहिण्याची गरज का भासली? जे लोक प्रकृती पूजक होते, जे नाग, वानर, गरुड़ अशा प्राणी पक्षांना आपले पूजनीय पूर्वज मानत होते त्या लोकांना ब्राम्हणांनी साप, माकड़ या रुपात का दर्शविले? आर्यांशी झालेल्या युद्धात ज्या अनार्याना कपटकारस्थान करुन पराजित करण्यात आले त्यांचे दैत्य, दानव, राक्षस असे चित्रण का केले? जीत आर्याना वेगवेगळ्या अवतारांच्या, देवतांच्या रुपात का दाखविण्यात आले? या माध्यमातून ब्राम्हण लेखकांना कुठल्या इतिहासावर पडदा टाकावयाचा होता?
'प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती' या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकारांनी इतिहासातील अशा अनेक घटनांचे कोड़े उलगडून दाखविले आहे. ब्राम्हणवादाने भारतीय इतिहासामध्ये आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कोणकोणत्या खेळी खेळल्यात हे सुद्धा दाखवून दिले आहे. रामायण, महाभारत, भगवतगीता, पुराण हे ग्रंथ लिहिण्याची गरज का भासली? हे ग्रंथ धार्मिक आहेत की राजकीय उद्देशाने प्रेरित होऊन लिहिले आहेत? बहुसंख्य हिंदूंच्या मते त्यांचे हे धार्मिक साहित्य अतिशय प्राचीन आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या मते हे ग्रंथ पुष्यमित्राच्या राजकीय विजयानंतर लिहिल्या गेले आहे. एवढेच नाही तर हे ग्रंथ एकाच काळात सुद्धा लिहिली गेली नाहीत. अनेक शतके त्यात भर पडत गेली. 'जय' नावाची एक छोटी रचना त्यात अनेक कथा दंतकथांची भर पडत जाऊन शेवटी त्याचे 'महाभारत' झाले. या ग्रंथाचे लेखन इ. स. १२०० पर्यंत होतच होते. महाभारताप्रमाणेच रामायणाचे सुद्धा असेच आहे. यामध्ये सुद्धा जुन्या नव्या विचारांची सरमिसळ आहे. यामध्ये सुद्धा अनेक दंतकथा जोडण्यात आल्या आहेत.
यावरून असा निष्कर्ष काढता येतो की, ब्राम्हण लेखकांनी अनार्याना दैत्य, दानव, राक्षस असे वर्णन करुन त्यांची निर्भस्तना करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनेक चमत्कारिक दंतकथा रचल्या. त्यांच्या पराजयाचे आणि आपल्या विजयाचे उत्सव, सण साजरे करण्यास बहुजन समाजास प्रवृत्त केले. इतक्यावरही बहुजन समाजाची आपल्या राजावरील निष्ठा कमी होत नसेल तर शेवटी त्यांचे ब्राम्हणीकरण करण्यात आले.
बामसेफला शिव्या देणारे काहीजण आहेत. बामसेफ शेवटी काय सांगतो? ते काही आपल्या हातचे सांगत नाही. अशा अनेक ग्रंथामध्ये दिलेल्या गोष्टींच्या कड्या जोडल्या की त्यातून जे निष्कर्ष निघतात तेच सोप्या पद्धतीने समाजावून सांगण्याचे काम बामसेफ करते. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन काळजीपूर्वक वाचले तर हे कुणालाही करता येते.
म्हणूनच बहुजन समाजाने आता आपला खरा इतिहास जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.